Saturday, September 21, 2024
Homesportsखुशखबर! टीम इंडिया वनडेमध्ये नंबर वन

खुशखबर! टीम इंडिया वनडेमध्ये नंबर वन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना ९० धावांनी जिंकला आणि मालिकाही ३-० अशा फरकाने जिंकली.  भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात किवी संघ केवळ २९५ धावाच करू शकला.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली होती. परंतु दुसरा विकेट पडल्यानंतर त्यांचे नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेले. शेवटी २९५ धावांवर न्यूझीलंडचा संघ गारद झाला.
न्यूझीलंडसाठी डेव्हन कॉनवेने शतक झळकावले. त्याने १०० चेंडूत १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १३८ धावा केल्या. मात्र, त्याला समोरून कोणीही साथ देऊ शकले नाही. त्यामुळे शेवटी न्यूझीलंडने सामना आणि मालिका गमावली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments