सरकार बदलले नसते तर विदर्भात अधिवेशन झाले नसते. चीन, कोरिया, जपानमध्ये कोरोना सुरु झाला, तो निकष जर आपल्याकडे लावून विदर्भात अधिवेशन घेतले नसते. अजित पवार यांना माहित आहे की, कोविड आणि लॉकडाऊन कुणाचा आवडता विषय आहे, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देताना ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की, देशासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्वाचा आहे. विदर्भाचा विकास आम्ही केंद्रस्थानी मानतो. यात नागपूर मुंबई समृद्धई महामार्ग सुरु झाला. तो सुरु करुन उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा महामार्ग सुरु केला, विदर्भातील समृद्धी महामार्गामुळे १० जिल्हे आणि १४ जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडत आहोत. मराठवाड्यात जालना- नांदेडलाही जोडत आहोत, इंटरस्टेटही हा मार्ग कनेक्ट केला जात आहे.
मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला जबाबदारी पूर्ण माहीत आहे. काम करताना याचा आम्हाला फायदा होईल. मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे किती काळ होते हे सर्वांना माहीत आहे. विदर्भाला मुख्यमंत्रीपद किती काळ होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी मविआला न्याय देता आला असता, असेही शिंदे म्हणाले.