जोरदार हवा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन गुजरातमध्ये भाजपच सत्ता स्थापन करेल, असे चित्र दिसून येत आहे. दिल्ली महानगरपालिकेत दमदार विजय मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीला मात्र या निवडणुकीमध्ये आपली जादू दाखवता आली नाही.
या निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन भाजप 154 जागांवर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्ष 20 जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष फक्त 5 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठी वातावरण निर्मिती करत केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला होता. आम आदमी पक्ष बहुमत मिळवत सत्ता स्थापन करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याबाबतची आपली भविष्यवाणी त्यांनी एका चिठ्ठीवर लिहूनही दिली होती. मात्र गुजरातमध्ये केजरीवाल यांच्या पदरी निराशा आली आहे.