- पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी इंग्लंडने जिंकली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतानमध्ये सुरू झाला होता, जो इंग्लंडने 26 धावांनी जिंकला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघ 4 बाद 198 धावांवर होता. त्यांना विजयासाठी शेवटच्या डावात 355 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे पाकिस्तान गाठू शकला नाही.
इंग्लंडने सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात पाकिस्तानला सर्वबाद करत विजय मिळवला. दुसऱ्या डावात पाकिस्तानसाठी इमाम उल हकने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याने सर्वात जास्त चार विकेट्स नावावर केल्या. - इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाला एकट्या अबरार अहमद याने 7 विकेट्स मिळवून दिल्या. अहमदच्या फिरकीच्या जाळ्यामुळे इंग्लंड पहिल्या डावात 281 धावांवर गुंडाळला गेला.
प्रत्युत्तरात पहिल्या डावात पाकिस्तानने 202 धावा केल्या. दुसरीकडे पाकिस्तानसाठी पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात देखील अबरारने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शेवटच्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य मिळाले होते. - मात्र, संघ 328 धावांवर सर्वबाद झाला. शेवटच्या डावात सौद शाकील याने 94, तर इमाम उल हक याने 60 धावा केल्या. कसोटी मालिकेतील हा पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव असल्यामुळे त्यांनी मालिका गमावली आहे. या पराभवानंतर पाकिस्तान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून बाहेर पडला आहे.