काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्ये वादविवाद पाहायला मिळतात. अनेक कलाकार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. अनेकदा प्रेक्षकांचा राग सांभाळणं फार कठीण होऊन जाते. असेच काहीसे दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत झाले आहे. भर गर्दीतून त्याच्यावर चप्पला फेकल्या गेल्या.
कन्नड अभिनेता दर्शन त्याचा आगामी चित्रपट ‘क्रांती’च्या प्रमोशनसाठी इवेंटला गेला होता. जेव्हा दर्शनची इवेंटमध्ये एण्ट्री झाली, तेव्हा प्रेक्षकांच्या गर्दीमधून कोणीतरी त्याच्या अंगावर चप्पल फेकून मारली.
दर्शनने एका मुलाखतीमध्ये, भाग्याची देवी नेहमी दार ठोठावत नाही. पण जेव्हा ती दार ठोठावेल, तेव्हा तिला पकडा आणि बेडरूममध्ये खेचून घेऊ जा. तिचे कपडे काढा. जर तुम्ही तिला कपडे दिले तर ती बाहेर जाईल, असे म्हटले होते. दर्शनच्या या विधानावरून वाद निर्माण झाला होता.