Sunday, October 6, 2024
Homeentertainmentएकच नंबर! अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ ला बंपर ओपनिंग

एकच नंबर! अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ ला बंपर ओपनिंग

  • अक्षयकुमारने दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांना अप्रतिम भेट दिली आहे, त्याचा चित्रपट ‘रामसेतू’सिनेमागृहात प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. अक्षयकुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा यांच्या ‘रामसेतू’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

    बॉक्स इंडियाच्या रिपोर्टनुसार, रामसेतूने पहिल्या दिवशी १५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. रामसेतूचे आगाऊ बुकिंग कमी असले तरी चित्रपटाने चांगली ओपनिंग नोंदवली. राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२२ मध्ये सलग तीन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षयचा हा वर्षातील शेवटचा प्रयत्न आहे, जो खूप यशस्वी मानला जात आहे. 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments