उर्फी जावेद सतत तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या रिविलिंग ड्रेसची चर्चा देशात पाहायला मिळते. आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला कपड्यांवरुन सुनावले. त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली. उर्फीने शिवीगाळ करत वाघ यांना उत्तर दिले आहे.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक स्टोरी पोस्ट केली आहे. मला कोणतेही ट्रायल नकोय. जर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी संपूर्ण संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. संपूर्ण जगाला सांगा की, तुम्ही कसे आणि कुठून पैसे कमावता. तुमच्या पार्टीमधील अनेक पुरुषांवर शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
उर्फी जावेदची चित्रा वाघ यांना शिवीगाळ
तुम्ही त्या महिलांसाठी काही करु शकता का हे पाहा चित्रा वाघ, या आशयाची स्टोरी उर्फीने पोस्ट केली आहे. पुढे तिने वाघ यांना शिवीगाळ करत, या राजकारण्यांकडे एखादे चांगले काम नाही. त्यांच्या वकिलांना अक्कल नाही का? आपल्या संविधनात असा कोणताच कायदा नाही जो मला तरुंगात टाकेल. ही सर्व लोक मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे सर्व करत आहेत. चित्रा वाघ माझ्याकडे तुमच्यासाठी थोड्या वेगळ्या आयड्या आहेत, असे तिने म्हटले आहे.