Saturday, September 21, 2024
Homemaharashtraआव्हाडांसाठी पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

आव्हाडांसाठी पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर काल विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. यातील पीडित महिलेने सुद्धा काल पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उडी घेतली आहे. पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याचे समजते. कोणत्याही राजकीय हेतूने अशा प्रकारची कारवाई करू नका, असे पवार म्हणाले.
दरम्यान पवार यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आलेली नाही. महिलेच्या तक्रारीनंतरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस योग्य दिशेने करत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments