Sunday, October 6, 2024
Homeentertainmentआरारारा खतरनाक ; 'दृश्यम 2' मध्ये सस्पेन्सचा जबरदस्त तडका

आरारारा खतरनाक ; ‘दृश्यम 2’ मध्ये सस्पेन्सचा जबरदस्त तडका

अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडसाठी यंदाचं वर्ष म्हणावं तितकं खास नव्हतं. अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले. काहींनी आपली जादू दाखवली. अशाच चित्रपटांपैकी एक ठरला ‘दृश्यम २’.

या चित्रपटाला रिलीज होऊन ९ दिवस उलटले आहेत. मात्र, दुसऱ्या वीकेंडला देखील या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवडाभरात ‘दृश्यम २’ १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसांत चित्रपटाच्या कमाईवर किंचितसा परिणाम झाला. 
मात्र, पुन्हा एकदा विकेंडला या चित्रपटाने मोठी उसळी घेतली आहे. दुसऱ्या वीकेंडच्या शनिवारी या चित्रपटाने तब्बल १४.०५ कोटींची कमाई केली आहे. तर, शुक्रवारच्या दिवशी हा आकडा ७.८७ कोटी इतका होता. ‘दृश्यम २’ या चित्रपटाने आतापर्यंत १२६.५८ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments