सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यालयात विशेष सहाय्यक सरकारी वकिलाची भरती होणार आहे.
सुमारे 28 पदांसाठी ही भरती होईल. यासाठी इच्छुक उमेदवार लॉ ग्रॅज्युएट असावा. यासाठी वयोमर्यादा 34 ते 43 वर्ष आहे. तसेच यासाठी ऑफलाईन अर्ज करावे लागेल. संबंधित उमेदवाराने महाराष्ट्र बार कौन्सिलकडे पंजीकरण केले असावे.
या पदासाठी उमेदवारांना 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. उमेदवारांना दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर येथे अर्ज करावा लागेल. या पदासाठी भरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे.