पॅन कार्डनंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स आधारकार्डशी संलग्न करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया घर बसल्याही करता येते. यासाठी सगळ्यात आधी राज्य परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल. यानंतर आधारवर क्लिक करुन ड्राप डाऊन मेन्यूमधून ड्रायव्हिंग लायसन्सची निवड करावी. आता ड्रायव्हिंग लायसन्स नंबर नोंदणीकृत करुन ‘गेट डिटेल्स’ वर क्लिक करा.
आता तुमचा १२ अंकी आधारकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक रजिस्ट्रर्ड करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक ओटीपी येईल. आता ओटीपी टाकून झाल्यावर ड्रायव्हिंग लायसन्सला आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.