जि.प.प्राथ.शाळा पाचेगाव (खुर्द) चा दरवर्षीप्रमाणे स्पर्धा परीक्षेतील दबदबा कायम

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

मंथन, बुद्धिवंत, एटीएस व ब्रिलियंट परीक्षेमध्ये 18 विद्यार्थी राज्य,जिल्हा व केंद्र यादीत

सांगोला (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव खुर्द या शाळेने मंथन, बुद्धिवंत,ब्रिलियंट व ATS परीक्षेत यश मिळवून तब्बल 18 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. शाळेतील पहिलीतील विद्यार्थी सार्थक कळसरड्डी याने मंथन परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक (150 पैकी 150), बुद्धिवंत परीक्षेत जिल्ह्यात दुसरा( 150 पैकी 134), ब्रिलियंट परीक्षेत राज्यात तिसरा( 100 पैकी 96), श्रीशा जुंदळे हिने मंथन परीक्षेत राज्यात दुसरा(150 पैकी 148), बुद्धिवंत परीक्षेत राज्यात दुसरा (150 पैकी 146) व ब्रिलियंट परीक्षेत राज्यात तिसरा( 100 पैकी 96) क्रमांक पटकाविला. अथर्व निंबाळकर याने मंथन परीक्षेत जिल्ह्यात दुसरा (150 पैकी 138) बुद्धिवंत राज्यात पहिला (150 पैकी 148)ब्रिलियंट जिल्ह्यात पहिला (100 पैकी 94) क्रमांक पटकाविला. शौर्य गोडसे याने मंथन राज्यात चौथा (150 पैकी 144) एटीएस राज्यात तिसरा (100 पैकी 96) बुद्धिवंत राज्यात चौथा (150 पैकी 142) ब्रिलियंट केंद्रात पहिला (100 पैकी 88) गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले.

इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी अशितोष कळसरड्डी याने मंथन केंद्रात पहिला (150 पैकी 120), बुद्धिवंत केंद्रात दुसरा ( 150 पैकी 122), ब्रिलियंट केंद्रात दुसरा (100 पैकी 82) एटीएस केंद्रात पहिला ( 200 पैकी 158) क्रमांक पटकाविला संस्कार शेळके याने बुद्धिवंत केंद्रात सहावा (150 पैकी 110) ब्रिलियंट केंद्रात पहिला क्रमांक पटकाविला. ईश्वरी मिसाळ हिने बुद्धिवंत केंद्रात दहावा ( 150 पैकी 102) एटीएस केंद्रात दुसरा क्रमांक पटकाविला. हर्षदा भंडगे हिने बुद्धिवंत केंद्रात नववा क्रमांक पटकाविला. रोहिणी मिसाळ ही बुद्धिवंत व प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाली तसेच अभय मिसाळ याने ब्रिलियंट परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले.

इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी श्रेया जुंदळे हिने मंथन राज्यात पाचवा (300 पैकी 292), ब्रिलियंट राज्यात पहिला (150 पैकी 142), बुद्धिवंत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला. वेदांत चौगुले याने ब्रिलियंट राज्यात तिसरा (150 पैकी 138) बुद्धिवंत केंद्रात चौथा क्रमांक पटकाविला. शौर्य मिसाळ याने बुद्धिवंत परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले तसेच शिवतेज मिसाळ याने बुद्धिवंत परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले आहे.

इयत्ता चौथी मध्ये अपूर्व शेळके याने मंथन राज्यात दुसरा (300 पैकी 298), बुद्धिवंत राज्यात तिसरा (300 पैकी 288), ब्रिलियंट राज्यात दुसरा (150 पैकी 140), एटीएस राज्यात तिसरा (300 पैकी 288) क्रमांक पटकाविला तसेच अपर्णा कळसरड्डी हिने मंथन केंद्रात पहिला (300 पैकी 288) बुद्धिवंत केंद्रात दुसरा ब्रिलियंट केंद्रात पहिला क्रमांक पटकाविला. समर्थ कळसरड्डी याने बुद्धिवंत केंद्रात सहावा, ब्रिलियंट केंद्रात पहिला, एटीएस जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकाविला तर पुष्पराज मिसाळ हा विद्यार्थी सोलापूर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाला आहे.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका वर्षा कोटी मॅडम व सहशिक्षक सचिन गोडसे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख दिनकर गाडे सर तसेच पाचेगाव खुर्द गावच्या सरपंच सौ. संगीता भोसले, पाचेगाव खुर्द विकास सोसायटी चेअरमन डॉ.राज मिसाळ, उपसरपंच श्री.भारत मिसाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामचंद्र यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री.शिवाजी मिसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.बाळासाहेब मिसाळ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालकांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon