11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार 30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

मुंबई : राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या 11 वी प्रवेशाची (XI admission) यादी दोन दिवसांआधीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे 11 वी प्रवेशाची पहिली यादी 30 जूनला जाहीर होणार होती, पण पहिली गुणवत्ता यादी आजच शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी (College) ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थी व पालकांना https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.

सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार 30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आजच यादी जाहीर झाली असून 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिला आहे. दहावी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर होऊन दीड महिना झाला अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत 12 लाख 71 हजार विद्यार्थी आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर जाऊन आपली गुणवत्ता यादी पाहून प्रवेशाचा निर्णय घ्यावा

 

दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना

राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होऊन जवळपास आता दीड महिना होत आलाय. मात्र, अजूनही दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावीमध्ये प्रवेश झालेला नाही. विद्यार्थी अजूनही पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. आज अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. या पहिला गुणवत्ता यादीची सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. मात्र, आज जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबतचे परिपत्रक  जारी केलं आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon