टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

इतिहासाचा अपमान का? ‘राजा शिवाजी’मधील वाघ नखांच्या सीनवरून टीका; अखेर रितेशनेच दिलं उत्तर

Follow Us:

रितेश देशमुखच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘राजा शिवाजी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. परंतु या ट्रेलरमधील एका दृश्यावरून नेटकऱ्यांने टीका केली आहे. या टीकेला आता रितेशनेच उत्तर दिलं आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या..

इतिहासाचा अपमान का? 'राजा शिवाजी'मधील वाघ नखांच्या सीनवरून टीका; अखेर रितेशनेच दिलं उत्तर
 ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट अभिनेता रितेश देशमुखचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यावर सर्वांनीच भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या रितेशनेच सांभाळल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा त्याने साकारली आहे. ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु त्यातल्या एका सीनवर एका नेटकऱ्याने आक्षेप नोंदवला आहे. या सीनचा उल्लेख करत संबंधित नेटकऱ्याने रितेशवर टीका केली आहे. त्यावर खुद्द रितेशनेच उत्तर दिलं आहे. ट्रेलरमधील संजय दत्त आणि रितेश यांच्यातला हा सीन आहे.

एका युजरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरमधील कथित ऐतिहासिक चुकांवरून रितेशवर टीका केली आहे. त्याने लिहिलं, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला वाघ नख दाखवलं होतं का? अफजलने महाराजांवर हल्ला केल्यानंतरच वाघ नख समोर आलं होतं. रितेशजी तुम्ही महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला का बदलत आहात?’ दुसऱ्या एका पोस्टमध्ये युजरने ट्रेलरमधील त्या दृश्याचा स्क्रीनशॉटसुद्धा जोडला आहे. त्यात पुढे लिहिलं, ‘रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हल्ल्यापूर्वीच अफजल खानाला उघडपणे वाघ नख दाखवताना दिसतात. ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की वाघ नख लपवून ठेवण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलच्या हल्ल्यानंतरच त्याचा वापर केला होता. रितेशजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची, वारशाची, अभिमानाची हेराफेरी आणि अपमान का करत आहात?’

रितेशचं उत्तर-

 

संबंधित युजरच्या या प्रश्नांवर खुद्द रितेशनेच उत्तर दिलं आहे. ‘आदरणीय सर, कृपया 1 मे रोजी हा चित्रपट नक्की बघा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटातच आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घ्याल. जय शिवराय!’ मात्र रितेशच्या या उत्तरावर युजरला खात्री पटली नाही. त्याने पुढे रितेशला म्हटलं, ‘म्हणजे सत्य चित्रपटाच्या आत आहे? उत्तरांसाठी चित्रपट पहा, हे काल्पनिक कथांसाठी दिलेलं स्पष्टीकरण ठीक आहे. पण इतिहासासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना चित्रित करताना ट्रेलरनेच प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. प्रश्न निर्माण होता कामा नये. ही रंजक स्ट्रॅटेजी आहे, संशयाचं मार्केटिंग करा आणि त्यानंतर स्पष्टीकरण विका.’

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी, फरदीन खान, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर अशी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट पहायला मिळतेय.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now