टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार? अखेर तारीख जाहीर; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी

On: May 23, 2026 1:50 PM
Follow Us:

Monsoon in Maharashtra: उन्हाळ्यातील उकाड्याने नागरिक हैराण झाले असून, कधी एकदा पाऊस पडतो याची आस सर्वांना लागली आहे. यावर्षी ऊन जरा जास्तच असल्याने सगळे आतुरतने मेघगर्जनेची वाट पाहत आहेत.

Monsoon in Maharashtra
1/8

Monsoon in Maharashtra: उन्हाळ्यातील उकाड्याने नागरिक हैराण झाले असून, कधी एकदा पाऊस पडतो याची आस सर्वांना लागली आहे. यावर्षी ऊन जरा जास्तच असल्याने सगळे आतुरतने मेघगर्जनेची वाट पाहत आहेत.

Monsoon in Maharashtra
2/8

जून महिन्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने आता लवकरच पावसाच्या सरी कोसळतील अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान हवामान विभागानेही आता खुशखबर दिली आहे.

Monsoon in Maharashtra
3/8

पाऊस सर्वात आधी केरळात दाखल होतो आणि त्यानंतर संपूर्ण देश व्यापण्यास सुरुवात करतो. 26 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज आहे.

Monsoon in Maharashtra
4/8

दरम्यान मान्सून महाराष्ट्रात 10 जूनला दाखल होईल असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राची नागरिक, शेतकरी यांना दिलासा मिळेल.

Monsoon in Maharashtra
5/8

महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मान्सूनपूर्व सरी कोसळल्या आहेत. पुणे, मुंबई, रायगड अशा ठिकाणी पावसाने काही अंशी हजेरी लावली आहे.

Monsoon in Maharashtra
6/8

यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी ऊनाचा कहर तर दुसरीकडे पाऊस असं चित्र आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाची शक्यता आहे.

Monsoon in Maharashtra
7/8

यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आली आहे.

Monsoon in Maharashtra
8/8

विदर्भात उष्णतेची लाट

विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमळ, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची, तसेच काही ठिकाणी रात्रीच्या वेळी उष्ण तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now