टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

उदनवाडी येथे चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना अटक

सांगोला (प्रतिनिधी):-चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना अटक करण्यात आले असून चोरट्यांकडून वापरण्यात येणारी हत्यारे जप्त करण्यात आली असल्याची घटना 18 मे 2025 रोजी रात्री 01.15 वा चे सुमारास हजारे वस्ती उखळाचे माळ उदनवाडी ता. सांगोला येथे घडली.घटनेची फिर्याद पोना सुजित जाधव यांनी दिली आहे.

पोलीसांनी अझरुद्दिन युनुस इस्लामपुरे वय 28 वर्षे, रा. रमामाता नंगर सांगली 2) गणेस शिवाजी वलेकर वय 21 वर्षे, रा. उदनवाडी ता. सांगोला यांना अटक केली आहे तर इंद्रजित सरगर, माणिक शेंडगे बोले व एक जण अनोळखी असे तिन जण अंधाराचा फायदा घेवुन लोकांना पाहून पळुन गेले आहेत.

याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 18 मे 2025 रोजी पहाटे 03/00 वाजता पोलीस पाटील उदनवाडी यांनी कळविले की, मौजे उदनवाडी येथे लोकांनी चोर पकडून ठेवले आहेत. त्यामुळे पोना सुजित जाधव, चालक पोकाँ आडके, व पोलीस पाटील आदी घटनास्थळी गेले असता लोकाची गर्दी जमलेली होती. तेथे दोन इसमांना पकडुन ठेवले होते. तेथील लोकांकडे चौकशी केली असता. त्यांनी सांगितले की, सदरचे 2 इसम व त्यांचे इतर 3 साथीदार असे दोन मोटार सायकलवर येवुन झुडुपाचे पाठीमागे लपुन बसले होते. त्यांची शंका आल्याने त्यांचेकडे जात असताना त्यातील 3 जण अंधाराचा फायदा घेवुन रानवाट्याने पळुन गेले आहेत. त्यापैकी दोघांना आम्ही पकडून ठेवले आहे. पंचांसमक्ष त्यांचे अंगझडती घेतली असता त्यांचे जवळ एक लोखंडी रॉड व एक चाकु तसेच दोन लाल चटणीच्या पुड्या असे साहित्य मिळुन आले आहे. त्यांचेजवळ एक यूनिकॉर्न मोटार सायकल व बिगर नंबरची स्कुटी अशी वाहने त्यांचे ताब्यात मिळुन आले आहे. पकडलेल्या दोन इसमांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ते व त्यांचे पळुन गेलेले साथीदार इंद्रजित हजारे यांचे घरी चोरी करण्याचे उद्देशाने दोन मोटार सायकलवरुन आलो असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

काकडी सोलून खाणे योग्य आहे की नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now