टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?

On: November 12, 2026 10:47 AM
Follow Us:

Tukaram Mundhe on Milk and Ghee: शेतकऱ्यांकडून कच्चं दूध घ्या, पण दुकानातील सुटं दूध विकत घेऊ नका. तुकाराम मुंढेंनी सांगितलं महत्त्वाचं कारण. चहाबाबत मुंढे काय म्हणाले?

Tukaram Mundhe on Milk and Ghee: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सामान्य नागरिकांना सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी अलीकडेच झालेल्या एका पत्रकार परिषदेत  यामागील कारणही समजावून सांगितले. तुम्ही शेतकऱ्यांकडून कच्चं दूध विकत घेत असाल तर ते घ्या, पण दुकानातील सुटे दूध विकत घेऊ नका. कच्च्या दुधात आणि सुट्या दुधात खूप मोठा फरक असतो, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

पाश्चराईज दूध  असेल तर ते सीलबंद पिशवीत किंवा पॅकेटमध्येच घ्या. त्यावरील एक्स्पायरी डेट आणि उत्पादनाची तारीख बघा, असा सल्ला तुकाराम मुंढे यांनी दिला. यावेळी त्यांनी विक्रेत्यांनाही भेसळ चालणार नाही, असा इशारा दिला. तूप , लोणी वनस्पती तेल, यामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ चालणार नाही. आधार नसलेले शुद्ध देसी तूप, दूध, असे दावे असतील तर बिलकून खपवून घेतले जाणार नाही. ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, शुद्ध तूप, 100 टक्के प्युअर, असा कोणताही प्रकार नसतो. असा दावा करुन कोणी तुप, दुधाची विक्री करत असेल तर आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करु, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Milk Ideal Temperature : बाजारातून दूध विकत घेताना त्याचे तापमान किती असावे, तुकाराम मुंढेंनी काय सांगितलं?

आपला चहा आणि पाश्चात्य देशात मिळणारा चहा वेगळा असतो. आपण चहात साखर आणि दूध मिसळतो. याबाबत बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. रोज सकाळी तुमच्या घरी दूध येते पिशवी येते किंवा कोणीतरी ते घेऊन येते. दूध तुमच्या घरात येण्यापूर्वी ते दुकानात असते, फ्रिजरमध्ये ठेवले असेल. मात्र, त्या फ्रिझमध्ये आवश्यक तापमान राखले जाते का, हे कोणालाच माहिती नसते. सुटे दूध ज्या टँकरमधून येते, तो साफ असतो की नाही खात्री देता येत नाही. त्यामध्ये योग्य तापमान असते का, याची खात्री नाही. दुधाचे तापमान हे 4 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असता कामा नये. गाई किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते दोन तासापेक्षा जास्त वेळ उघड्यावर सामान्य तापमानात ठेवले तर त्यामध्ये अॅसिडिटी निर्माण करणारे घटक निर्माण होतात, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Mudra Loan: विना हमी 20 लाखांचं कर्ज मिळणार, मोदी सरकारचा योजनेत मोठा बदल, काय आहे अपडेट?

MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत ‘महालॅब’ रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल

अखेर मुंबईने हार्दिकला सोडलं, पंजाबचा मोहरा अर्शदीप सिंग पलटनच्या हाती, किती कोटींची डील?

Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल

Rajendra Pawar Ajit Pawar: “काय बंधू?” अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले….

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्य