टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Top Headlines : टॉप हेडलाईन्स | 23 जून 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. नीट परीक्षेत गुण कमी पडल्यानं मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण, बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूने सांगली हादरली

  2. हिंदीच्या सक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस Vs मनसे: राज्यात उर्दू चालते, मग हिंदी का नाही? संग्राम जगताप यांनी केला हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध

  3. पेट्रोल 120 रुपये लिटरपर्यंत पोहोचू शकते: कारण- इराण तेल पुरवठ्याचा सर्वात मोठा मार्ग बंद करू शकतो, कच्चे तेल $80 वर पोहोचले

  4. विधानसभेत षंढ लोक बसलेत: विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्याने मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका; हक्कभंग दाखल होणार?

  5. शरद पवारांना सोडून चूक केली मात्र मी नाराज नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण, आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा

  6. भास्कर जाधवांच्या मनात काय वेदना आहेत त्या उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त करतील, संजय राऊतांचे वक्तव्य

  7. मनसेच्या संदीप देशपांडेंच्या तोंडाचा पट्टा सुरुच, ठाकरे गटाला म्हणाले, आम्ही तुमच्यासारखे कुणाचे पाय चाटले नाहीत

  8. दीप देशपांडे-राऊतांच्या शा‍ब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात, मातोश्रीवरुन आदेश आल्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, मराठी माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा, शिवसैनिकांनी जबाबदारीचे भान ठेवून व्यक्त व्हावे

  9. पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आता राज्यभर आंदोलन, सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी समन्वय समिती स्थापन

  10. पुढील दोन दिवसात कोकण-मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, मराठवाड्यात वीज-वादळांसह पावसाचा अंदाज

  11. मराठी हा मुद्दा आहे का? लोक फालतू गोष्टी बोलतात: भाषेबद्दल बोलताना अबू आझमींचे अजब विधान, हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले

  12. युरोप आशियाला जोडणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या संसदेची मंजुरी

  13. राहुल-पंतची जोडी पुन्हा रंगात, चौथ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडविरोधात टीम इंडियाकडे 250 धावांची आघाडी

 

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now