दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार, अनेक भागात पिकांचं नुकसान, यंदा मान्सूनही वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज
-
रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट
-
ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला जवानांचाही सहभाग होता: BSFचे DIG म्हणाले- पाकचे बंकर उध्वस्त केले, 50 दहशतवाद्यांची घुसखोरी रोखली
-
CJI म्हणाले- वकिलांना सुट्टीच्या काळात काम करायचे नाही: न्यायाधीशही सुट्टीवर असतात, पण प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला जबाबदार धरले जाते
-
अकरावी प्रवेशाला सुरुवात: पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ
-
मोदी 200 देश फिरले, पण फायदा झाला नाही: परदेशात जाणारे शिष्टमंडळ म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संजय राऊत यांची बोचरी टीका
-
शत्रूला सांगून हल्ला करणे हे देशप्रेमाचे लक्षण आहे का?: पाकचे 15 हजाराचे ड्रोन 15 लाखांच्या क्षेपणास्त्राने पाडले – विजय वडेट्टीवार
-
आता 200 रुपयातच होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी: राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा
-

-
पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर: पूजाने कोणताही मोठा गुन्हा केला नाही, सर्वस्व गमावले, तिला कुठेही नोकरी मिळणार नाही – SC
-
पाक दहशतवादी आमिर हमजा जखमी असल्याचा दावा: लष्करी रुग्णालयात दाखल, हाफिज सईदचा निकटवर्तीय, भारतात हल्ल्याचा कट रचला होता
-
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढील 36 तासांत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता
-
मला पाकिस्तानात लग्न करायचं आहे, गद्दार ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबतचं नवं चॅट समोर, ज्योतीची पाकिस्तानात अनेक बँक खाती असल्याचंही उघड
-
छत्तीसगडमधील अबूझमाडच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असलेला नक्षली संघटनेचा सेक्रेटरी राजू बसव ठार, पंतप्रधान मोदी, अमित शाहांकडून कारवाईचं कौतुक
-
सरन्यायाधीश हे कायस्वरूपी ‘राज्य अतिथी’, भूषण गवईंच्या नाराजीनंतर राज्य सरकारकडून परिपत्रक जारी
-
‘साथी’ पोर्टलवरील प्रमाणित बियाणे घ्या, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, महाविस्तार अॅपवरुन शेतकऱ्यांना A To Z माहिती देणार
-
IPL मध्ये ऑलराउंडर्सचा दबदबा कमी होत चालला: यावेळी 100+ धावा करणारे आणि 10+ विकेट्स घेणारे दोनच खेळाडू, गेल्या वेळी 8 होते













