टॉप हेडलाईन्स | 20 मार्च 2025 | गुरूवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2025 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करा, वडिलांची हायकोर्टात याचिका; तर आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, सत्ताधारी मंत्री, आमदारांची सभागृहात मोठी मागणी

  • भाजप नेते नगरविकास खात्याची प्रकरणे काढत असतानाच नागपूरमध्ये दंगल कशी?: उद्धव ठाकरेंचा प्रश्न; फडणवीसांना म्हणाले- ‘तुझा माझ्यावर भरवसा नाय काय?’

  • आदित्य ठाकरेंना टार्गेट करू नये: पण दिशा सालियान प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भूमिका

  • नागपूरमध्ये दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत: स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार

  • विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय, मंत्री दादा भुसे यांची माहिती

  • विधिमंडळ अधिवेशन: शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यावर अत्याचार झाल्यास संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • चहल-धनश्रीचा घटस्फोट झाला: हायकोर्टाच्या आदेशावरून फॅमिली कोर्टाचा निर्णय, 4.75 कोटींच्या पोटगीवर सेटलमेंट

  • गेल्या 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, प्रकरण कोर्टात, कोर्ट निर्णय घेईल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

  • आदित्य ठाकरेंनी 8 जूनचं मोबाईल लोकेशन दाखवावं, ही ओपन अँड शट केस; मंत्री नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

  • दिशा सालियनच्या मृत्यूच्यावेळी आदित्य ठाकरे कुठे?; तीन वर्षांआधी समोर आली होती महत्वाची माहिती, तेव्हा आदित्य ठाकरे आजोबांना पाहण्यासाठी रुग्णालयात होते

  • आदित्य ठाकरेंनी ड्रिंक करुन ते कृत्य केलं असं मला खोटं लिहायला सांगितलं, दिशा सालियन प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

  • एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, संजय गायकवाड म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही

  • नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, सुत्रधार फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

  • ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात घोषणा

  • छत्तीसगडच्या बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद

  • बीडमधील सतिश भोसले उर्फ खोक्याची पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी

  • चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा तीनपट जास्त रक्कम केली जाहीर, 58 कोटींचं बक्षीस

  • विराटसोबत खेळला, भारताला विश्वचषक जिंकून दिला; कोहलीचा मित्र तन्मन श्रीवास्तव आता IPL मध्ये अंपायरिंग करणार!

  • WTC 2025-27 मध्ये लागू होऊ शकते बोनस पॉइंट सिस्टम: मोठ्या फरकाने जिंकल्यास अतिरिक्त गुण मिळतील, भारताच्या इंग्लंड दौऱ्याने सुरू होईल पुढील सायकल

  • राजस्थान रॉयल्सने रियान परागची कर्णधारपदी नियुक्ती केली: तीन सामन्यांत संघाचे नेतृत्व करणार, संजूला फलंदाज म्हणून संघात समाविष्ट केले जाईल

इतर बातम्या

Mahindra XUV700 Ebony भारतात लॉन्च, फीचर्स, किंमत जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अजितदादांकडून योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon