Top Headlines : टॉप हेडलाईन्स | 17 एप्रिल 2025 | गुरुवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • आता इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 च्या नव्या निर्णयाने वाद

  • देशात एक संपर्क भाषा असली पाहिजे,त्या दृष्टीनं केंद्राने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेचा समावेश केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

  • महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही: मनसे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा

  • काँग्रेसचाही हिंदीच्या सक्तीला विरोध: ​​​​​​​विजय वडेट्टीवार म्हणाले – तिसरी भाषा म्हणून हिंदी लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी अस्मितेवर घाला

  • वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश: नियुक्ती थांबवल्या; केंद्राला 7 दिवसांत उत्तर मागितले, 5 मुख्य आक्षेपांवर सुनावणी होणार

  • सुप्रीम कोर्टाचा भाजपच्या एटीट्यूडला धक्का: ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची टीका, वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या स्थगितीवरून घणाघात

  • चंद्रकांत खैरेंबद्दल प्रश्न विचारताच अंबादास दानवे संतापले: म्हणाले- आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत, कृपया काड्या करणे बंद करा

  • उपराष्ट्रपती म्हणाले- न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाही: न्यायमूर्ती ‘सुपर संसदे’प्रमाणे काम करताहेत; कलम 142 आण्विक क्षेपणास्त्र बनले

  • हिंदुत्त्व नाही लाज सोडली, बाळासाहेबांचा AI आवाज; एकनाथ शिंदेंचा दरेगावातून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

  • तांत्रिक कारणामुळं उड्डाण करण्यास परवानगी न मिळाल्यानं पिंपळनेर दौरा रद्द, जड अंत:करणानं निर्णय घेतल्याची धनंजय मुंडेंची माहिती

  • काँग्रेसला मोठा धक्का,भोरचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती

  • महाराष्ट्र सरकारच्या व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा,महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळे यांना पुरस्कार जाही

  • बीसीसीआयचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या निकटवर्तीयांना धक्का, अभिषेक नायरसह , टी दिलीप, सोहम देसाईंची हकालपट्टी

  • IPL मध्ये MI vs SRH सामना: मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली; या हंगामात दोन्ही संघ 2-2 सामने विजयी

 

हेही वाचा

सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत या दिवशी होणार

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon