टॉप हेडलाईन्स ; 15 मार्च 2025 | शनिवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील  राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या, शिवसेना ठाकरे गटाची मागणी, न्यायालयाच्या निर्णयावर संताप

  • एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते: संजय राऊत यांचा मोठा दावा; तर ते रोजच भांग पीऊन काहीही बोलतात, शिवसेनेचा पलटवार

  • अंजली दमानिया यांची शरद पवारांवर बोचरी टीका: म्हणाल्या – ज्या लोकांमुळे बीडची स्थिती गंभीर झाली, ते तुमच्याच तालमीत मोठे झाले

  • कर नाही त्याला डर कशाला, मी कधीही चुकीचे काम करत नाही, न्यायालयाच्या निरीक्षणावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य

  • सतीश भोसलेचं घर पाडण्यासाठी अति घाई केली; आमदार सुरेश धस जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार

  • शेतकरी आत्महत्येची बाब चिंताजनक, या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारनं लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु, शरद पवारांचं वक्तव्य

  • शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल मानले आभार

  • महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात ‘पोलीसराज’ प्रस्थापित करायचाय का?

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या ताटाखालचे मांजर, ते काँग्रेसमध्ये जाणार होते, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा

  • नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, जरा थांबायला हवं होतं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिलेल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला

  • लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, माझ्या विभागाला एकूण 7 हजार कोटींचा फटका, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य

  • जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा

  • यशवंतराव चव्हाणांनी साकारलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा घाट, तेलंगणातील भाजपचे आमदार टी.राजा कोल्हापुरातील मोर्चात सहभागी होणार

  • कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली

    ‘छावा’चा बॉक्स ऑफिसवर नादखुळा परफॉर्मन्स; ‘पुष्पा 2’वरही केली मात, फक्त एकाच महिन्यात 540.38 कोटी रुपयांची वसुली

  • क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण; साऊथ फिल्म डेब्यूसाठी सज्ज, FIRST LOOK रिलीज

  • द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तान क्रिकेटमधील खेळाडूंच्या इज्जतीचा फालुदा, 45 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं; पण एकालाही कोणी विकत घेतलं नाही

  • महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार अंतिम सामना

  • भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत रोहितच राहील कर्णधार: BCCI ने पाठिंबा दिला, रोहितने त्याच्या कर्णधारपदाखाली 9 महिन्यांत 2 ICC जेतेपद जिंकले

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon