टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

निरोगी आयुष्य जगण्याचा विचार करताय? आजच ‘या’ सवयींचा त्याग करा…

जवळपास प्रत्येकाची एकच इच्छा असते आणि ती म्हणजे आपल्या आयुष्यात कोणतेच आजार नको. पण त्यासाठी जीवनशैली देखील योग्य असली पाहिजे. तर जाणून घ्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

निरोगी आयुष्य जगण्याचा विचार करताय? आजच 'या' सवयींचा त्याग करा...

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजार डोकंवर काढतात. असे आजार ज्यांची नावे देखील आपल्या आजी – आजोबांना माहिती नसतील. कारण त्यांच्या काळात जीवनशैली उत्तमम होते. पण आता सर्व काही मोठ्या प्रमाणात बदललं आहे. ज्याचा परिणाम शरीरावर आणि आरोग्यावर होत आहे. व्यायाम करणे, सकस आहार घेणे, मोबाईलचा मर्यादित वापर करणे, रात्री लवकर झोपणे, या सर्व सवयींचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, परंतु आपल्या दैनंदिन सवयींमधील काही चुका, मग त्या जाणीवपूर्वक असोत वा अजाणतेपणे, आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. पण, या सवयींमुळे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून, काही सवयींचा त्याग करा आणि निरोगी आयुष्य जगा.

दीर्घकाळ लघवी रोखून धरणे : बरेच लोक दीर्घकाळ लघवी रोखून धरतात. जरी याचा त्यांच्या आरोग्यावर त्यावेळी परिणाम होत नसला तरी, नंतर यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा लघवी मूत्राशयात अडकून राहते, तेव्हा जिवाणूंची वेगाने वाढ होऊ शकते, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. म्हणून, लघवी रोखून धरण्याची सवय वाईट आहे ती असेल तर आजच सोडा.

तोंड उघडे ठेवून झोपणे : काही लोकांना तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते. ही गोष्ट जरी साधी वाटत असली तरी, तिचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तोंड उघडे ठेवून झोपल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि हृदयविकार, उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारख्या आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात.

एकाच स्थितीत बराच वेळ बसणे : बराच वेळ एकाच स्थितीत किंवा चुकीच्या स्थितीत बसणे आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. उदाहरणार्थ, बराच वेळ वाकून बसल्याने किंवा काम केल्याने पाठ आणि मानेवर अतिरिक्त ताण येतो. शिवाय, बराच वेळ एकाच जागी बसल्याने पुढे जाऊन सांध्यांच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

घाईघाईने खाणे : आपल्यापैकी बरेच जण घाईघाईने जेवतात आणि पटकन संपवतात. ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खातो, ज्यामुळे पोट फुगते. म्हणून नेहमी आपले अन्न सावकाश व्यवस्थित चावून खा.

शौचालयात बराच वेळ बसून राहणे : बहुतेक लोक शौचालयात बसून मोबाईल फोन पाहण्यात बराच वेळ घालवतात. शौचालयात बराच वेळ बसून राहणे चांगले नाही. शौचालयात बराच वेळ बसून राहिल्याने रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे मूळव्याधीचा धोका वाढतो.

चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे : जर तुम्हाला चेहऱ्याला वारंवार स्पर्श करण्याची सवय असेल, तर आजच ही सवय बदला. दिवसभर आपले हात अनेक वस्तूंना स्पर्श करत असल्यामुळे, त्यांच्यावर जीवाणू जमा होतात. त्याच हातांनी चेहऱ्याला स्पर्श केल्याने त्वचेचे संक्रमण, पुरळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Gold Rate : सोन्याने झोप उडवली रे…10 ग्रॅमचा भाव पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; किंमत थेट…

Omraje: श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले तिरुपती बालाजीचे देवदर्शन

Maharashtra Rain Weather Update:पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे  

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO