टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याचे भाव आज डायरेक्ट.. 10 ग्रॅमचा दर किती ?

Gold Price Today 16 May 2026 Latest News Updates in Marathi: एकीकडे पंतप्रधान मोदींनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं असलं तरी लग्नसराईच्या मोसमात मात्र सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीचा कल वाढताच दिसत आहे. दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने चढउतार होत असून शनिवार, 16 मे रोजी या मौल्यवान धातूंच्या दराने मात्र…

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याचे भाव आज डायरेक्ट.. 10 ग्रॅमचा दर किती ?

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र सध्या लग्नसराईचा मौसम सुरू असून बरेच लग्नाचे मुहुर्त आहेत. अशावेळी सोनं-चांदीची खरेदी आणखीनच वाढते. दोन्ही मौल्यवान धातू असून त्यांच्या दरातही सातत्याने चढउतार होताना दिसतात. दरम्यान देशात सोन्याच्या दरात होणारी वाढ थांबली आहे. शनिवार, 16 मे रोजी सकाळी या धातूंच्या दरात घसरण झाली. आज सकाळी, राजधानी दिल्लीत 4 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,050 रुपयांपर्यंत घसरला. तर आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 3200 पयांनी, म्हणजेच 1.93 टक्क्यांनी घसरून प्रति10 ग्रॅसाठी 1, 62, 000 रुपयांवर आला होता. डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफावसुली केल्यामुळे सोन्याच्या किमती घसरल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,548.46 डॉलर्स इतका आहे.

देशातील काही मोठ्या शहरातील सोन्याचे दर

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,050 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,890 आहे. तर आर्थिक राजधानी मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,44,740 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,57,900 रुपये आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 161,070 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 147,640 रुपयांवर पोहोचला आहे.तर पुणे आणि बंगळुरू या दोन शहरांत, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 157900 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 144740 रुपये आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹)
दिल्ली 144890 158050
मुंबई 144740 157900
अहमदाबाद 144790 157950
चेन्नई 147640 161070
कोलकाता 144740 157900
हैदराबाद 144740 157900
जयपुर 144890 158050
भोपाळ 144790 157950
लखनऊ 144890 158050
चंदीगड 144890 158050

चांदीची किंमत

चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घट होत आहे. 16 मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम2,89,9000 रुपयांपर्यंत घसरला. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 21,600 रुपयांनी, म्हणजेच 7.3 टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्राम २2,75,000 पयांवर आला होता. या वर्षी जानेवारी महिन्यात, भारतात चांदीच्या किमतीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 78.21 डॉलर आहे. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.

एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीत 82 टक्क्यांची वाढ

यावर्षी एप्रिल महिन्यात भारताची सोन्याची आयात 81.69 टक्क्यांनी वाढून 5.62 अब्ज डॉलरवर पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये चांदीची आयात 157.16 टक्क्यांनी 41.1 कोटी डॉलरवर पोहोचली. 2025-26 या आर्थिक वर्षात सोन्याची आयात मूल्याच्या दृष्टीने 24 टक्क्यांनी वाढून विक्रमी 71.98 अब्ज डॉलरवर पोहोचली. असं असलं तरीही, परिमाणाच्या दृष्टीने आयात 4.76 टक्क्यांनी घटून 721.03 टन झाली. चांदीची आयात जवळपास 150 टक्क्यांनी वाढून 12 अब्ज डॉलर झाली. परिमाणाच्या दृष्टीने, ती 42 टक्क्यांनी वाढून 7334.96 टन झाली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now