टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जवळे संस्थेच्या आंधळगांव प्रशालेच्या सभागृहाचे उद्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

सांगोला (प्रतिनिधी):- विद्या विकास मंडळाच्या कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आंधळगांव येथील सभागृह उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते तर आमदार समाधान अवताडे यांचे अध्यक्षतेखाली उद्या सोमवार दि.16 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती सुरेशआबा पालवे, संस्था अध्यक्ष मा.आमदार दीपकआबा साळुंखे -उपस्थित राहणार असल्याचे सचिव सुभाष लऊळकर यांनी सांगितले.

जवळा ता.सांगोला येथील विद्या विकास मंडळ जवळे संस्थेच्या कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आंधळगांव येथे विलास कुलकर्णी यांनी त्यांचे दिवंगत माता पित्याचे नावाने प्रश्नासाठी सभागृह बांधून दिले आहे. या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवानंद पाटील, प्रकाशआप्पा गायकवाड, लतीफभाई तांबोळी, विजयराव खवतोडे, तानाजी खरात, अजितराव जगताप, बसवराज पाटील, भारत नागणे, ज्ञानेश्वर वगैरे, प्रवीण खवतोडे, शंकर माळी, भारत बेंद्रे, भारत पाटील, अरुण किल्लेदार, विलास कुलकर्णी (आंधळगावकर) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्याची सुभाष लऊळकर यांनी केले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now