Raj-Uddhav Thackearay Vijayi Melawa : राज्यभरातून त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केला. तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर वातावरण तापले. यातच दोन्ही ठाकरे बंधुंनी संयुक्त भूमिका घेत सरकारविरोधात मोर्चा काढण्याचे ठरवले होते. परंतु त्याआधीच सरकारने त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याने आता शिवसेना आणि मनसेकडून मराठी भाषेसंदर्भात विजयी मेळावा होणार आहे. ज्याचे ठिकाण सामनातून जाहीरा करण्यात आले आहे.
मुंबई : राज्यभरातून त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केला. तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर वातावरण तापले. यातच दोन्ही ठाकरे बंधुंनी संयुक्त भूमिका घेत सरकारविरोधात मोर्चा काढण्याचे ठरवले होते. परंतु त्याआधीच सरकारने त्रिभाषा धोरणाचा पुर्नविचार केला आणि जीआर रद्द केला. आता ठाकरे बंधु ५ जुलैला ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) कडून मराठी भाषेसंदर्भात विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार असून ठाकरे बंधुंची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेचं मुखपृष्ठ ‘सामना’मधून मेळाव्याचे ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधुंची एकजूट झाली असली तरी विजयी मेळाव्याला राजकीय महत्व देखील प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर येत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत. मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असून ही आगामी निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी असल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यावर नियोजनाची धुरा सोपवण्यात आली आहे.
सामनामधून कोणती घोषणा?
हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने एल्गार पुकारल्याने सरकारने गुडघे टेकत शासकीय आदेश मागे घेतला. मराठी माणसाच्या एकजुटीचा हा प्रचंड विजय आहे. ५ जुलैला मराठी विजय दिवस साजरा केला जाणार आहे. वरळी येथील डोम सभागृहात हा विजयोत्सव होणार असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ‘मराठी माणूस विखुरलाय असे वाटल्यानंतर मराठीद्रोही पुन्हा डोके वर काढतात. काल आपण ते डोके चिरडून टाकले आहेच, पण त्यांनी पुन्हा फणा वर काढू नये, म्हणून एकजूट कायम ठेवली पाहिजे,’ यातून ठाकरे बाणा समोर येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन सोमवारी सूचक पोस्ट करण्यात आली होती. ‘ठरलं! ठाकरे येत आहेत’ असं ट्विट करण्यात आलं. ठाकरे या शब्दात अनेक शक्यता सामावल्या आहेत. आगामी निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचे चित्र असून यासाठी पडद्यामागील हालाचालींना वेग आला आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या भेटीगाठी वरचेवर वाढल्याचेही चित्र आहे, त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना बळ मिळत आहे.
हेही वाचा