Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 90 सैनिक ठार झाल्याचा BLA चा दावा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आता बलूच आर्मीच्या दहशतवाद्यांनी हा सहा दिवसात दुसरा मोठा हल्ला चढवला आहे.

पाकिस्तान सैन्याच्या ताफ्यावर (Pakistan Attack On Armed Forces) रविवारी मोठा हल्ला करण्यात आला. बलूचिस्तानच्या नुश्की भागातून पाकिस्तान सैन्याचा ताफा जात होता. त्यावेळी IED स्फोटकाच्या माध्यमातून या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्लात सैनिकांनी भरलेली एक बस पुर्ण पणे नष्ट झाली. या हल्ल्यात 90 पाक सैनिक मारले गेल्याचे समोर येत आहे. शिवाय बलूच लिब्रेशन आर्मीने 90 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र हा दावा पाकिस्तान प्रशासनाने फेटाळला आहे. या हल्ल्यात 11 सैनिक मारले गेले आहेत, तर 21 जण जखमी झाल्याचे पाक प्रशासनाने सांगितले आहे. हे सैनिक क्वेटाहून काफ्ताना इथं जात होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला.

पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यात एकूण 8 बस होत्या. शिवाय अन्य गाड्यांचाही समावेश होता. बलूच आर्मीच्या दहशतवाद्यांनी आधी या बसना लक्ष्य केले. या बस त्यांनी IED स्फोटकांनी उडवून दिल्या. या हल्ल्यात सैन्याची एक बस पुर्ण पणे जळून खाक झाली. या आठवड्यातील BLA ने केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. 11 मार्चला बलूच आर्मीच्या दहशतवाद्यांनी जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती. हा हल्लाही बलूचिस्तानमध्येच केला गेला होता. या ट्रेनमधील 21 प्रवाशी मारले गेले होते. त्यावेळी 48 तासात बलूच राजनितीक कैद्यांना सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आता बलूच आर्मीच्या दहशतवाद्यांनी हा सहा दिवसात दुसरा मोठा हल्ला चढवला आहे. 11 मार्चला मंगळवारी जाफर एक्सप्रेस ही क्वेटा हून पेशावरला जात होती. त्यावेळी ट्रेनमध्ये 440 प्रवाशी प्रवास करत होते. त्याच वेळी सशस्त्र दहशतवाद्यांनी या ट्रेनवर हल्ला केला होता. रेल्वेचे रुळही बॉम्बने उडवून देण्यात आले होते. अनेक लोकांना यात आपला जीव गमवावा लागला. शिवाय अनेक जण जखमी ही झाले होते.

जवळपास 30 तास चकमक झाली. पाकिस्तानी सैन्याने 33 दहशतवाद्यांना यावेळी ठार केले. शिवाय 4 सैनिकांचाही मृत्यू झाला. 21 प्रवाशांनाही यात जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यानंतर आता परत एकदा बलूच आर्मीने हा मोठा हल्ला केला आहे. असाच हल्ला कश्मीरमध्ये पुलवामा इथं झाला होता. त्या हल्ल्याच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या आहेत. दरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

MS Dhoni Pention amout : एमएस धोनीला किती रुपये पेन्शन मिळते?

IPL 2025 : 18 व्या मोसमातील सर्वात महागडा कर्णधार कोण? कमी रक्कम या कॅप्टनला

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon