SSC Result : दहावीत पडले कमी गुण? पूनर्मूल्यांकनासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज, शुल्कासह जाणून घ्या प्रक्रिया

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Maharashtra Board SSC Result 2025 : इयत्ता दहावीच्या निकालात मुलींचा वरचष्मा पुन्हा दिसून आला. मुलींनी बाजी मारली. तर कोकणने सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाची परंपरा कायम ठेवली. पण ज्यांना कमी गुण मिळाले आहेत, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

इयत्ता दहावीत परंपरेप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलांपेक्षा उत्तीर्ण होण्यात मुलींचा टक्का अधिक आहे. कोकण विभागाने सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाची परंपरा कायम ठेवली आहे. राज्यातील 9 विभाग निहाय निकालात कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के इतका लागला. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल आला. त्यातच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना गुण कमी मिळाले असे वाटत असेल तर त्यांना गुणांचा पडताळा करता येईल. त्यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल.

गुणांची पडताळणी

विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करता येईल. उद्यापासून १४ मे पासून २८ मे पर्यंत २०२५ पर्यंत गुण पडताळणी करता येईल. त्यासाठी मंडळाकडे अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करता येईल. शुल्क भरुन विद्यार्थ्यांना गुणांचा पडताळा करता येईल. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार आहे.

एक किंवा दोन विषयात नापास झाले तरी विद्यार्थ्याला इयत्ता ११ वीत प्रवेश दिला जातो. त्यांना एटीकेटीची सोय करुन देण्यात आली आहे. इयत्ता १२ वी ला जाण्यापूर्वी फेब्रुवारीतील परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि ११ वीची परीक्षा पास झाला तर तो १२ वीसाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon