Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे.

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. (Mahayuti Vidhan Parishad Election 2026)
महायुतीचे अंतिम जागावाटप- (Vidhan Parishad Election 2026)
- भाजप -11
- शिवसेना – 4
- राष्ट्रवादी काँग्रेस – 2

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कोणाला कोणती जागा?, संपूर्ण यादी- (Vidhan Parishad Election 2026)
भाजप- (BJP Vidhan Parishad Election 2026)
1) सोलापूर-
2) जळगाव-
3) भंडारा-गोंदिया
4) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
5) अमरावती-
6) धाराशिव-लातूर-बीड
7) नागपूर-
8) छ.संभाजीनगर- जालना
9) अहिल्यानगर-
10) सांगली-सातारा
11) नांदेड-

शिवसेना- (Shivsena Vidhan Parishad Election 2026)
1) ठाणे-
2) नाशिक-
3) परभणी-
4) यवतमाळ-
राष्ट्रवादी काँग्रेस- (NCP Vidhan Parishad Election 2026)
1) कोकण-
2) पुणे-















