टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दुकानाबाहेर बेवारस बॅग, पोलीस धावले, मुंबईत मोठी खळबळ

On: May 31, 2026 1:20 PM
Follow Us:

मुंबईच्या भुलेश्वर परिसरात एक बेवारस बॅग सापडली आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपास सुरू आहे.

मुंबईचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत एका दुकानाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच पोलीसही अलर्ट झाले आहेत. पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब निरोधक पथकाला पाचारण करण्यात आलं असून पथक येईपर्यंत हा परिसर सील करण्यात आला आहे. मुंबईच्या भुलेश्वर परिसरात एक बेवारस बॅग सापडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या बॅगेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका दुकानाबाहेर ही बॅग ठेवण्यात आली. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी केली जात आहे. या बॅगेबद्दल पोलिसांनी परिसरातील नागरिकांनी माहिती दिली.

वर्दळीच्या ठिकाणी बेवारस बॅग मिळाल्याने खळबळ..

मुंबईचा हा भुलेश्वर परिसर अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. याच परिसरात ही बॅग सापडल्याने तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या. ही बॅग नक्की कोणी आणून ठेवली, याचाही शोध घेतला जात आहे. मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. याबाबत बोलताना पोलिसांनी म्हटले की, अगोदर आम्ही तपास करत आहोत.

मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल 

तपास केल्यानंतरही नक्की सांगता येईल, की काय आहे. मुंबई पोलिस खात्यातील महत्वाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलिसांचे प्रत्येक परिस्थितीवर बारीक नजर आहे. नागरिकांना या परिसरात न थांबण्याच्या सूचनाही पोलिसांकडून दिल्या जात आहेत. पोलिसांनी काही वेळातच पूर्ण परिसर रिकामा केला.

बॉम्बशोधक पथकाकडून तपासणीला सुरूवात

इतक्या वर्दळीच्या परिसरात अशाप्रकारे बेवारस बॅग सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी केली जात आहे. मात्र, या घटनेने मुंबई अलर्ट मोडवर आहे. पोलिस सर्तक झाले आहेत. मुंबईचा भुलेश्वर परिसर म्हणजे अत्यंत वर्दळीचा आहे. तिथे लोकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. परिसरातील रहिवाशांनी या बेवारस बॅगबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now