टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur Crime News: ‘पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेला…’; बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, सगळे हळहळले!

Solapur Crime News: शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.

सोलापूर :  बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये अत्यंत हृदयद्रावक (Solapur Crime News) घटना घडली आहे. क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावर जाऊन आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू (Solapur Crime News) झाला आहे. शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे, मृत आरवचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.(Solapur Crime News)

कोच विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे मुलांना सराव देत होते. शनिवारी सकाळी सहा वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर ७ ते ७:३० च्या दरम्यान १२ ते १५ वर्षाच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून जड रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. कोच लांब उभे होते,असे फिर्यादीत म्हटले आहे. रोलर ओढताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तत्काळ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. बार्शी पोलीस पुढील तपास करत आहेत.(Solapur Crime News)

Solapur Crime News: नेमकं काय घडलं?

बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावर जाऊन आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) रा. बार्शी या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी (४५, रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी दिलेल्या जबाबानुसार येथील मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.

योगीराज चौधरी यांनी, अल्पवयीन मुलांकडून धोकादायकपणे रोलर ओढून घेताना कोच यांनी निष्काळजीपणा केला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला, असे मुलाच्या वडिलांनी जबाबात म्हटले आहे. या घटनेमुळे बार्शीत हळहळ व्यक्त होत आहे.शनिवारी सकाळी सहा वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर ७ ते ७:३० च्या दरम्यान १२ ते १५ वर्षाच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून जड रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. कोच लांब उभे होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. रोलर ओढताना आरवचा तोल गेला व तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तत्काळ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे पुढील तपास करत आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

उन्हाळी सुट्टीत घरातच मुलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी उपयुक्त इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज

Delhi Malviya Nagar Fire : हॉटेलमध्ये आगीचा प्रचंड लोट, आक्रोश अन् किंचाळ्यांचे आवाज, अनेकांनी तिसऱ्या मजल्यावरून…; दिल्लीतील अग्नितांडवबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हादरवणारा घटनाक्रम

संत सोपानदेव पालखी सोहळ्याला वेग; पालखीचे 12 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापुरात खळबळ ! काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद, ऐनवळी मोठा गेम

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर विधान परिषद निवडणूक: शेकापचा भाजपला पाठिंबा, राजकीय समीकरणे बदलणार!