Solapur Accident : टेम्पोची ओम्नीला जोरदार धडक, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल मालकासह ड्रायव्हरचा अपघातात मृत्यू

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Solapur Accident Hotel Owner Death : सोलापूर पुणे महामार्गावर आयशर आणि ओम्नी कार यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला

सोलापूर : विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पोने डिव्हायडर ओलांडून कारला दिलेल्या धडकेत सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल मालक आणि कार चालकाचा मृत्यू झाला. 52 वर्षीय रवींद्र सुभाष वाघमोडे, रा. कोळेगाव, मोहोळ आणि त्यांचे चालक अनिल दत्तात्रय वाघचवरे, वय 34, रा. भांबेवाडी, सोलापूर, या दोघांना अपघातात प्राण गमवावे लागले. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी येथील पेट्रोल पंपासमोर घडली आहे.

मंगळवारी दुपारी रवींद्र वाघमोडे हे कामानिमित्त सोलापूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एक टेम्पोने रस्त्यातील दुभाजक ओलांडून सोलापूरकडे येणाऱ्या कारला धडक दिली.

अपघात इतका भीषण दोघे कारमध्ये अडकले

सोलापूर पुणे महामार्गावर आयशर आणि ओम्नी कार यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता. मृत्यू झालेले रवींद्र वाघमोडे आणि अनिल वाघचवरे हे दोघे कारमध्ये अडकले होते. अपघातस्थळी उपस्थितांनी त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

वाघमोडे यांच्या पश्चात आई, वडील, मुले असा परिवार आहे. अपघाताची माहिती कळताच मृतांच्या कुटुंबीयांनी खाजगी हॉस्पिटल परिसरात एकच गर्दी केली होती. सायंकाळच्या वेळेस शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

सोलापूर पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

खाजगी कामानिमित्त तालुका पोलिस चौकीचे सहायक फौजदार बख्तियार अत्तार हे कोंडीकडे (ता उत्तर सोलापूर) जात असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी व इतर सहकाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केली. पुणेहुन सोलापूरला येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. जवळपास अर्धा ते पाऊण तास रांगा लागल्याची माहिती उपस्थितांनी दिली.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon