Shiv Sena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की दुसरा उमेदवार देणार?, याकडे महाविकास आघाडीचे लक्ष आहे.

Shiv Sena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाणार की दुसरा उमेदवार देणार?, ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) लक्ष आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास फारसे इच्छुक नसले तरी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर परत यावे, यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत- (Shivsena UBT Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषद उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीमध्ये कुठले प्रकारची चर्चा न करता इतर दोन पक्षांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिला जाईल. अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यासोबतच काँग्रेस पक्षाकडून मांडण्यात आली आहे. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसतील, तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यसभेप्रमाणे अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा? (Shivsena UBT Vidhan Parishad Election 2026)
ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare), माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), माजी खासदार राजन विचारे (Rajan Vichare), माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik), सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) या पाच ते सहा नावाची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतात की आपल्या पक्षातील इतर नेत्याला विधान परिषदेसाठी संधी देतात हे पाहावे लागेल.







