टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Bigg Boss : बिग बॉसच्या घरात राडा… राकेश बापटला विशालने डिवचलं

Follow Us:

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या नॉमिनेशन प्रक्रियेदरम्यान राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं. विशालने यावेळी राकेशच्या खासगी आयुष्यावरून, त्याच्या घटस्फोटावरून टोमणा मारला.

तुझा घटस्फोट का झाला, तुझे किती अफेअर, सगळंच सांगतो..; राकेश बापटला विशालने डिवचलं, बिग बॉसच्या घरात राडा

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच रंगतोय. स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली असून दररोज बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा पहायला मिळतोय. रविवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरातून एक नव्हे तर दोन स्पर्धक बाद झाले. यात प्रभू शेळके आणि संकेत पाठक यांचा समावेश होता. त्यानंतर नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली. यावेळी राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात चांगलीच जुंपली. नॉमिनेशन प्रक्रियेत राकेश अनुश्री माने आणि विशाल कोटियन यांना नॉमिनेट करतो. यावेळी राकेश विशालबद्दल बरंच काही बोलतो. तेव्हा विशाल राकेशला त्याच्या घटस्फोटावरून आणि खासगी आयुष्यावरून डिवचतो.

नॉमिनेट करताना राकेश विशालबद्दलचा राग व्यक्त करतो आणि न पटलेल्या गोष्टी सांगतो. “विशाल प्राजक्ताला आणि तन्वीला माझ्याबद्दल बरंच काही बोलला होता. मालाड स्टेशनला याच्यासारखे कितीतरी भेटतील. इथे एखाद्याने 25 वर्षे मेहनत केलेली असताना त्याच्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. त्याचं बाहेरच्या गोष्टी घरात बोलणं चुकीचं आहे”, अशा शब्दांत राकेश निशाणा साधतो. यानंतर विशाल आणि राकेश यांच्यात शाब्दिक चकमक होते आणि विशालची जीभ घसरते.

“तुझ्याबद्दल मला काय माहीत आहे, हे मी सांगतो. बाहेर ये तू. तुझा घटस्फोट का झाला, तुझे किती अफेअर होते, हे सगळं मी सांगतो”, असं म्हणत विशाल राकेशला डिवचतो. त्यानंतर राकेशचाही राग अनावर होतो. “तू माझ्या घटस्फोटाबद्दल का बोलतो”, असा सवाल करत तो विशालच्या अंगावर धावून जातो. राकेश आणि विशाल दोघंही नियंत्रणाबाहेर जात असल्याने घरातील इतर स्पर्धक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. अखेर बिग बॉस त्या दोघांना बाजूला घेऊन जायला सांगतो. “याच्याकडे दुसरं काही बोलायला नाही, म्हणून हा माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतोय”, असं म्हणत राकेश गार्डन एरियामध्ये आदळ आपट करतो.

या भांडणादरम्यान विशाल राकेशला धक्का देतो. त्याच्या या कृत्याची बिग बॉस त्याला शिक्षा देतो. विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात येतं. तर राकेशलाही बाराव्या आठवड्यात नॉमिनेट करून कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद केलं जातं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now