टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Dhurandhar 2 BO Collection Day 11 Worldwide: ‘धुरंधर 2’चा जगभरात धुमाकूळ

Follow Us:

Dhurandhar 2 BO Collection Day 11 Worldwide: भारतामध्ये 846.87 कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनसह ‘धुरंधर: द रिवेंज’ हा रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Dhurandhar: The Revenge' box office collection day 9: Ranveer Singh, Rakesh  Bedi, Arjun Rampal's film mints over Rs 1,100 cr worldwide | Hindi Movie  News - The Times of India

Dhurandhar 2 BO Collection Day 11 Worldwide: बॉलिवूडचा (Bollywood News) बाजीराव म्हणजे, तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला रणवीर सिंहची (Ranveer Singh) 2026 ची सुरुवात अत्यंत जबरदस्त ठरलीय. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) या सिनेमाच्या यशानं त्यानं नव्या वर्षाची सुरुवात केलीय. पहिल्या भागाची क्रेझ अजूनही कायम असतानाच ‘धुरंधर 2’नं (Dhurandhar The Revenge) प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतलंय. सुरुवातीपासूनच प्रेक्षक आणि ट्रेड एक्सपर्ट्सना अपेक्षा होती की, ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 Box Office Collection) ‘धुरंधर’चे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढेल आणि अगदी तसंच घडलं. अवघ्या 11 दिवसांत ‘धुरंधर: द रिवेंज’नं पहिल्या भागाच्या कमाईलाही मागे टाकलंय.

भारतामध्ये 846.87 कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनसह ‘धुरंधर: द रिवेंज’ हा रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. एवढंच नाही, तर जगभरातही या सिनेमानं जबरदस्त कामगिरी केलीय.

‘धुरंधर 2’चा 11 दिवसांचं वर्ल्डवाइड कलेक्शन (Dhurandhar 2 Box Office Collection)

Dhurandhar 2 Box Office: Dhurandhar The Revenge Movie Review, Rating:  Ranveer Singh's Film Crosses Rs 100 Crore On Day 1 - Goodreturns

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, सिनेमानं दुसऱ्या रविवारी म्हणजेच, 29 मार्च 2026 रोजी सुमारे 8 टक्क्यांनी वाढ नोंदवत 19,270 शोमध्ये 68.10 कोटी रुपयांची कमाई केलीय. यानंतर भारतातील एकूण नेट कलेक्शन 846.87 कोटींवर पोहोचलं असून, ग्रॉस कलेक्शन 1,011.95 कोटी रुपये झालंय. फक्त देशातच नाहीतर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमानं परदेशातही धुरळा उडवलाय. अकराव्या दिवशी ‘धुरंधर 2’नं ओव्हरसीज मार्केटमध्ये 25 कोटी रुपयांची भर घालत एकूण 350 कोटी रुपयांचा टप्पा गाठलाय. यासह सिनेमाचं एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 1,361.95 कोटी रुपयांवर पोहोचलंय.

वर्ल्डवाइड टॉप 4 मध्ये पोहोचलाय ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2 In Top $ Worldwide)

‘धुरंधर: द रिवेंज’नं केवळ 11 दिवसांत आपल्या पहिल्या भागाचा 1,307.35 कोटी रुपयांचं लाईफटाईम कलेक्शन पार करत मोठी कामगिरी केलीय. यासह हा सिनेमा जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय.

वर्ल्डवाइड धमाकेदार कमाई करणारे टॉप 4 सिनेमे (Top 4 Movies with Explosive Worldwide Earnings)

फिल्मचं नाव  बॉक्स ऑफिस कलेक्शन (कोटींमध्ये)
दंगल (2016) 2,070 कोटी
बाहुबली 2 (2017) 1,788 कोटी
पुष्पा 2 (2024) 1,742 कोटी
धुरंधर: द रिवेंज (2026) 1,361.95 कोटी

दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची कथा एका अंडरकव्हर भारतीय गुप्तहेराभोवती फिरते, जो पाकिस्तानातील कराची शहरात घुसून गुन्हेगारी संघटना आणि राजकीय साखळ्यांमध्ये शिरकाव करतो. 26/11 हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी तो धोकादायक मिशनवर निघतो आणि या प्रवासात त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prashant Padole Accident : महाराष्ट्रात खासदाराच्या कारला ट्रकची जोरदार धडक, एअर बॅगच उघडली नाही, नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Raja Shivaji Box Office Collection: अखेर, तो क्षण आलाच! ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींच्या रणांगणात सिंहगर्जना; 17 व्या दिवशीही शौर्याची लाट कायम

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ बनला चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा; लवकरच ‘वेड’चा विक्रम मोडणार

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या कमाईची घोडदौड सुरूच; 5 दिवसांत रितेश देशमुखच्या चित्रपटाने किती कमावले?

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’नं बॉक्स ऑफिस हादरवलं; अवघ्या 3 दिवसांत काळजाला भिडला, कमाई किती?

Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

Raja Shivaji Box Office: रितेशच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास, मराठीत बिगेस्ट ओपनर ठरला ‘राजा शिवाजी’