एकतपुर (वार्ताहर )- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवले नगर या आयएसओ शाळेला शैक्षणिक उठावातून बरेच साहित्य मिळाले आहे.त्यामुळे सोयी सुविधांनी शाळा परिपूर्ण झालेली आहे. त्यातच शाळेच्या स्वयंपाक घरामध्ये आवश्यक असणारी गरज म्हणजे फ्रीज. श्री पल्लवी रामदास नवले मॅडम या दोघांनी शाळेची ही गरज ओळखून शाळेला 17 हजार रुपयाचा फ्रिज भेट दिला.
श्री रामदास नवले व सौ पल्लवी मॅडम शाळेची गरज ओळखून नुकतेच सर्विस ला जॉईन झालेले असताना सुद्धा त्यांनी एवढे मोठे कार्य केले आहे. शाळेतर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन.यापूर्वीही नवले नगर परिसरातील लोकांनी शैक्षणिक उठावातून चार लाख रुपयांची संगणक लॅब निर्माण केलेली आहे. श्री रामदास नवले व पल्लवी मॅडम यांच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
शाळेच्या स्वयंपाक घरात फ्रीज ही अत्यावश्यक गरज आहे कारण शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी भाजीपाल्याची नितांत गरज असते. तो भाजीपाला जास्त दिवस टिकून राहत नाही आता फ्रिज मुळे तो जास्त दिवस टिकणार आहे व मुलांना चांगल्या दर्जाचा शालेय पोषण आहार मिळणार आहे.
श्री रामदास नवले गुरुजी यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विक्रम नवले उपाध्यक्ष श्री दीपक इंगोले सरपंच श्री निवास जाधव केंद्रप्रमुख असलम इनामदार गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले यांनी अभिनंदन केले आहे