Nana Patole : ‘मोदी तुमचा बाप असेल, पण…’ विधानसभेत काय घडलं? नाना पटोलेंवर कारवाई

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Nana Patole : विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले आज सभागृहात प्रचंड आक्रमक झाले होते. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. तिथे त्यांची विधानसभा अध्यक्षासोबत वादावादी झाली.

विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले यांचं आज सभागृहात आक्रमक वर्तन पहायला मिळालं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. “या सदनातले सन्मानीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. हे अजिबात चालणार नाही. कारवाई झाली पाहिजे” असं नाना पटोले म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला. “तुमच्याकडून अससंसदीय भाषेचा उपयोग होणं मला बरोबर वाटत नाही. हे योग्य नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले. नाना पटोले आपल्या जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले. तिथे ते आक्रमकपणे बोलत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं.

“जर भाजपचे आमदार आणि कृषीमंत्री मोदी शेतकऱ्यांचा बाप आहे असं बोलत असतील. मोदी यांचा बाप असू शकतो, पण शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही. शेतकऱ्यांना अपमानित करण्यासाठी हे सत्तेत आहेत का?. शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात म्हणून हे सत्तेत आहेत का? यापेक्षा असंवैधानिक काय असू शकतं” असा सवाल नाना पटोलेंनी केला. सभागृहातून निलंबन झाल्यानंतर ते बाहेर माध्यमांशी बोलत होते.

‘आम्ही त्यांना बरबाद होऊ देणार नाही’

“मोदी यांचा बाप असू शकतो, आम्हा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही. मोदी शेतकऱ्यांना मारण्यासाठी सत्तेत आला आहे. हे आम्ही बोलणार. मोदीच सरकार सत्तेवर आल्यापासून देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. हे शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करणार होते. पण बियाणांचे भाव वाढले, पिकांचे भाव कमी झाले. शेतकऱ्यांची लढाई आम्ही लढणार. आम्ही त्यांना बरबाद होऊ देणार नाही. आम्हाला फडणवीसांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. फडणवीस शेतकरी विरोधी आहे. म्हणून मोदी यांचा बाप होऊ शकतो, आमचा नाही, हे मी वारंवार म्हणीन” असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon