टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्यातील सर्व 34 मते राजेंद्र राऊत यांनाच मिळतील-शहाजीबापू पाटील

On: June 12, 2026 6:43 PM
Follow Us:

राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात

सोलापूर, दि. १२ जून : सोलापूर येथील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शहाजीबापू पाटील म्हणाले, “राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. सांगोला तालुक्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच मिळतील. शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द अंतिम असून एका मताचाही फरक पडणार नाही.”

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “स्थानिक निवडणुकांमध्ये काय झाले यापेक्षा भविष्यातील विकास महत्त्वाचा आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. विकासनिधीच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू देणार नाही.”

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, “शिवसेना पूर्ण ताकदीने महायुतीसोबत उभी राहील. राजेंद्र राऊत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.”

 उमेदवार राजेंद्र राऊत यांनी विचार व्यक्त करताना जिल्ह्यामध्ये महायुती माझ्या पाठीमागे असून मा आ शहाजी बापू पाटील साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे सारखी मातब्बर मंडळी सोबत असल्यामुळे सर्वांचा आशीर्वाद मिळेल हीच अपेक्षा आहे अशी भूमिका व्यक्त केली

बैठकीस उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, माढा लोकसभा संपर्कप्रमुख पैलवान चंद्रहार पाटील, शिवसेना उपनेते माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित जिल्ह्यातील तसेच सांगोल्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now