टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’नं बॉक्स ऑफिस हादरवलं; अवघ्या 3 दिवसांत काळजाला भिडला, कमाई किती?

Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’ सिनेमानं महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विक्रमी ओपनिंग करत मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला.

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा केवळ हिंदी प्रेक्षकांनाच भुरळ घालत नाहीये, तर तो मराठी प्रेक्षकांचीही मनंही जिंकतोय. बॉक्स ऑफिसवर (Raja Shivaji Box Office Collection) दणक्यात एन्ट्री घेतल्यानंतर, या सिनेमानं आपल्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशीही सर्वाधिक कमाई केली आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमानं महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विक्रमी ओपनिंग करत मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर सिनेमानं रिलीजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही दमदार कामगिरी केली.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’शी स्पर्धा करण्यासाठी थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला, साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत असलेला, क दिन’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुरता आपटला आहे. सिनेमाची आतापर्यंतची कामगिरी फारच निराशाजनक आहे.

 

‘राजा शिवाजी’नं तिसऱ्या दिवशी किती कमावले? (Raja Shivaji Box Office Collection Day 3)

सॅल्कनिकनं दिलेल्या आकडेवारीनुसार, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 11.35 कोटींची कमाई केलेली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, शनिवारी 10.55 कोटींची कमाई केली. पण, तिसऱ्या दिवशी सिनेमानं जोरदार मुसंडी मारत 12 कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच, एकूण तीन दिवसांत रितेश देशमुख यानं एकूण 33.90 कोटींची कमाई केली आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या एकूण कमाईत सर्वात मोठा वाटा हा मराठी आवृत्तीचा आहे. ‘राजा शिवाजी’ यावर्षीचा मराठीतील सर्वात कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक अनुभव न राहता, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव ठरत आहे. राज्यभरातून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळताना दिसत आहेत. कुटुंबांसह चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत असून, ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील वर्षातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 4th May 2026 : अनपेक्षित बातमी समजणार, या राशींसाठी आजचा दिवस… वाचा तुमचं भविष्य !

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

Raja Shivaji Box Office: रितेशच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास, मराठीत बिगेस्ट ओपनर ठरला ‘राजा शिवाजी’

इतिहासाचा अपमान का? ‘राजा शिवाजी’मधील वाघ नखांच्या सीनवरून टीका; अखेर रितेशनेच दिलं उत्तर

Sagar Karande: ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला…

Bigg Boss Marathi 6: अखेर, ‘त्या’ स्पर्धकाला दाखवला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता; नाव समोर आलं; प्रेक्षकही म्हणाले…

Raja Shivaji: रितेशच्या ‘राजा शिवाजी’मध्ये सलमान खानची मोठी भूमिका; टीझरनंतर चर्चांना उधाण