Pune Accident : ब्रेक दाबताच कंटेनरमधील लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसून ड्रायव्हर जागेवरच गतप्राण, अंगावर काटा आणणारं दृश्य

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा विचित्र अपघात आपघात झाला आहे, यामध्ये ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे.

पुणे: पुण्यातील चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण (Pune Accident) अपघाताची घटना घडली असून, एका कंटेनर ट्रकला मोठा अपघात झाला आहे. या ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणावर लोखंडी रॉड्स होते. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू (Pune Accident) झाला असून, क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे.(Pune Accident)

ही घटना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. ट्रक मध्ये असलेले लांब लोखंडी रॉड्स योग्य प्रकारे बांधले गेले नव्हते. ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारताच, मागील बाजूला असलेले रॉड्स जोरात पुढे सरकले आणि थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. . ट्रक हे लांब लोखंडी रॉड्स घेऊन ते चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होती. यावेळी अचानक ब्रेक दाबल्यानं यातील सळया किंवा लोखंडी बार हे थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.

मदतीसाठी नागरिक धावले पुढे

या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, ट्रक मध्ये भरलेल्या लोखंडी रॉड्स केबिनमध्ये आरपार गेले आहेत. अपघात होताच काही नागरिक आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रॉड्स इतके मोठे आणि जड होते की त्यांना हलवणे देखील कठीण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं, अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत केली. हा अपघात ट्रकमध्ये लोखंडी रॉड्स ठेवताना असलेली निष्काळजीपणा आणि वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon