Gujarat Bhupendra Patel Ministers List: गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये निवडणूक प्रचारापूर्वी, भाजपने राज्यमंत्र्यांची संख्या वाढवली आहे. आतापर्यंत सरकारमध्ये फक्त १६ मंत्री होते. नवीन मंत्रिमंडळात आता एकूण २५ मंत्री आहेत. मागील मंत्र्यांपैकी फक्त सहा जणांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आले आहे.
अहमदाबाद: भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये काल (गुरुवारी) राजकीय हालचाली वेगाने (Gujarat Bhupendra Patel Ministers List) झाल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व १६ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. आज (शुक्रवारी) सकाळी गांधीनगरमध्ये सकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा (Gujarat Bhupendra Patel Ministers List)पार पडणार आहे. यात कोणाला संधी मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता नव्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे.(Gujarat Bhupendra Patel Ministers List)
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. आज (शुक्रवारी) गांधीनगर येथील महात्मा मंदिरात झालेल्या शपथविधी सोहळ्यात १० माजी मंत्र्यांच्या जागी एकूण १८ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. नवीन मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्वही वाढविण्यात आले आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आणि माजी मंत्री मनीषा वकील यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणारे राज्यातील प्रमुख नेते अर्जुन मोधवाडिया यांना मंत्रीपद देण्यात आले. भूपेंद्र पटेल यांच्या टीममध्ये माजी आयपीएस अधिकारी पीसी बरंडा यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोरबीचे आमदार कांतिभाई अमृतिया यांचीही मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या




