टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पोलीस प्रशासनाची जुगार अड्ड्यावर कारवाई; 13 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त

On: May 31, 2026 12:51 PM
Follow Us:

पंढरपूर (31):-  पंढरपूर तालुक्यातील मौजे खर्डी येथील खताळ वस्ती येथे काही इसम रमी नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती  मिळाली.  माहितीबाबत पोलीस प्रशासनाने  खात्री  केली असता   एका आंब्याच्या झाडाखाली मोकळया जागेत रात्री 10.45 वाजता लाईटच्या उजेडात काही इसम जुगार खेळत असल्याचे निर्देशनास आले. सदरठिकाणी तात्काळ कारवाई करुन 13 लाख 65 हजार 170 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची  माहिती सहा. पोलीस  अधिक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.

सदर  जागा संतोष सुखदेव खताळ याच्या मालकीची असून ही जागा जुगार खेळण्याकरीता वापरण्यास दिल्याचे समजले. या कारवाईत 11 हजार 170 रुपये रोख, सात  मोबाईल, पत्याची पाने, दोन चारचाकी वाहन, तीन  दुचाकी मोटार सायकल असा एकुण 13 लाख 65 हजार 170 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये खर्डी  येथील संतोष सुखदेव खताळ वय 32 वर्षे,  फिरोज इलाही आतार, वय 38 वर्षे, मारूती नारायण अभिमंत वय 36 वर्षे, समाधान भारत वाकडे वय 35 वर्षे, सिताराम मारूती चव्हाण वय 38वर्षे तर  अस्लम दाउद शेख, वय 32 वर्षे, रा. शेळवे, कुलजित मारूती देशमुख वय ४०, रा. कासेगाव,  दिगंबर लक्ष्मण पवार वय 55 वर्षे, रा. उंबरगाव  अशा आठ जणांवर कारवाई करण्यात आली.

सदर कामगिरी  पोहेकॉ श्री. सर्जे, पोकॉ  श्री हुलजंती, माने, भंडरवाड, सावंत, कुचेकर, साठे, लोखंडे, सुर्यवंशी, लोंढे यांनी केली असल्याची माहिती सहा. पोलीस  अधिक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now