PM Kisan 23rd Installment Date: आता शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. मशागतीला वेग आला आहे. दमदार पाऊस झाला की शेतकरी पेरणीला सुरूवात करेल. त्याला सरकारकडून लवकरच छोटीशी आर्थिक मदत मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

18 जून रोजी जमा होणार हप्ता?
काही दाव्यांनुसार, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता (PM Kisan Yojana 23rd Installment) 18 जून रोजी येऊ शकतो. पण सरकारतर्फे अद्याप याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात येते. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत तारीख समोर येत नाही, तोपर्यंत याविषयी काहीही सांगता येत नाही.

ही तारीख चर्चेत येण्यामागे मागील हप्ता जमा होण्याचे कनेक्शन आहे. 2024 मध्ये 18 जून रोजी 17 वा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यामुळे यंदा 18 जून रोजी 23 वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शेतकऱ्यांना सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतिक्षा आहे.
23 व्या हप्त्यासाठी स्टेटस कसे तपासावे?
23 वा हप्ता जमा होणार की नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर स्टेट्स तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करावे. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्स चेक करा. यामध्ये जर तुमच्या नावासमोर काही त्रुटी दाखवत असतील तर ती अगोदर दूर करा. ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे लिहिलेले असेल तर लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ही माहिती ताबडतोब अपडेट करा. त्यामुळे तुमचा पीएम किसानचा हप्ता थांबणार नाही.
शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून सुद्धा फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट करू शकतात. त्यांनी या साईटवर आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा आणि अखेरीस सबमिट बटण दाबावे.












