टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली

On: June 17, 2026 10:35 AM
Follow Us:

Operation Tiger UBT Shivsena: गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे 19 जूनला शिवसेनेचा मेळावा वर्धापन दिन, 60 वा वर्धापन दिन, यावेळी खासदार ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती

Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि हे सहा खासदार सध्या दिल्लीत असून बुधवारी सकाळी ते लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना आपल्या स्वतंत्र गटाचा शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा असल्याचे पत्र सादर करतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या खासदारांना सोबत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाच्या नऊपैकी सहा खासदारांना गळाला लावण्यात यश मिळवले आहे. आपले खासदार फुटणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता ठाकरे गटात हालचालींना वेग आला आहे. (Maharashtra Politics News)

ठाकरे गटाने खासदारांनी फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यास काय करायचे, यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्यानुसार ठाकरे गट या फुटीर खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप पाठवण्यात आल्याची माहिती आहे. व्हीप पाठवल्यानंतर खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 2022  मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यानंतर जशी बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली होती अगदी तशीच खासदारांची बैठक आताही  फुटीच्या उंबरठ्यावर घेण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरु आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या फुटण्याचा विचार करणाऱ्या  खासदारांना कायदेशी रित्या बैठकीसाठी व्हीप जारी करून अडचण निर्माण करण्याचा विचार सुरु आहे. ठाकरेंची शिवसेना उद्या सर्व खासदारांना दिल्लीत बैठकीसाठी बोलवण्यासंदर्भातला व्हीप जारी करण्याची शक्यता आहे. कायदेशीर सल्ला घेऊन सर्व खासदारांनी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला जाणार असल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत हे यासंबंधी व्हीप जारी करुन कायदेशीररित्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासंबंधी सूचना देऊ शकतात.

Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली

Shivsena Shinde Camp: लोकसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंना भेटीची वेळ दिली

लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना भेटीची वेळ दिली आहे. खासदारांचा वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याचा कळताच ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना काल रात्री उशिरा पत्र देण्यात आले होते. या पत्रांवर सहा खासदारांच्या सह्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष सहा खासदारांनी उपस्थित राहून त्या सह्या आपल्याच आहेत हे प्रत्यक्षपणे सांगून वेगळ्या गटाची प्रक्रिया लोकसभा अध्यक्षांना भेटूनच पूर्ण होऊ शकते. शिंदे शिवसेनेकडून अशा प्रकारचे पत्राची कुणकुण लागतच ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा ओम बिर्ला यांना पत्र लिहून कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा आणि आपल्या पक्षाला आपली भूमिका किंवा आपलं मत मांडण्याची संधी देऊन पुढील निर्णय घ्यावा, असं पत्रात म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now