Omraje Nimbalkar in Delhi : खासदार ओमराजे निंबाळकर अखेर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे, खाजगी विमानाने रात्री १ वाजता उड्डाण केल्याची माहिती आहे.

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान, ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar in Delhi) हे अखेर दिल्लीत दाखल झाले आहेत. काल (मंगळवारी) रात्री १ वाजता एका खाजगी विमानाने त्यांनी पुण्यातून दिल्लीसाठी उड्डाण केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.(Omraje Nimbalkar in Delhi)
Omraje Nimbalkar in Delhi : श्रीकांत शिंदेंच्या नावाने होती २ खाजगी विमाने सज्ज
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतर नेत्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमाने (Private Jets) पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती.(Omraje Nimbalkar in Delhi)
Omraje Nimbalkar in Delhi : वेळेत तीनदा बदल; असं होतं नियोजन
ओमराजे निंबाळकर यांच्या दिल्ली दौऱ्याचा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता आणि काल दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत तब्बल तीन ते चार वेळा बदल करण्यात आला:
पहिला प्लॅन: दुपारी ३ वाजता दिल्लीला जाण्याचे ठरले होते.
दुसरा प्लॅन: त्यात बदल करून संध्याकाळी ५ ची वेळ निश्चित झाली.
तिसरा प्लॅन: पुन्हा बदल करत रात्री ९ वाजता उड्डाण करण्याचे ठरले.
अंतिम उड्डाण: अखेर सर्व गुप्तता पाळत, रात्री १ वाजता खाजगी विमानाने पुण्यातून दिल्लीसाठी उड्डाण केले.

Omraje Nimbalkar in Delhi : माजी मंत्री तानाजी सावंत आणि जय राजेही सोबत
या विशेष विमानाने केवळ ओमराजे निंबाळकरच गेले नाहीत, तर त्यांच्यासोबत महायुतीचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जय राजे निंबाळकर हे देखील दिल्लीला गेल्याची विश्वसनीय माहिती आहे. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमुळे ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
Omraje Nimbalkar in Delhi : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याची माहिती होती आणि त्यांनी कॅमेऱ्यापासून अंतर ठेवले होते. ते पुण्यात असल्याचा दावा केला जात होता, मात्र रात्रीच्या या गुप्त मोहिमेमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीत आज वरिष्ठ पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव मधील गोवर्धनवाडी येथील घरी शुकशुकाट दिसून येत आहे. मुलाचं आजारपण आणि वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालासाठी कुटुंबासह पुण्यात होते. आपण पुण्यातच असल्याची ओमराजे निंबाळकर यांची एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे. मात्र ओमराजे निंबाळकर कॅमेरापासून अंतर ठेवून असल्याने पुण्यात की दिल्लीत संभ्रम वाढला आहे. संपूर्ण कुटुंबासह ओमराजे निंबाळकर पुण्यात गेल्याची घरात काम करत असलेल्या लोकांची माहिती आहे. दैनंदिन वापराच्या गाड्या घराच्या पार्किंग मध्ये आहेत.

Shivsena UBT MP: काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील












