टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बापरे! अशोक खरातची भविष्यवाणी खरी ठरणार? दिल्लीत मोठ्या हालचाली, नेमंक काय घडतंय?

Follow Us:

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता अशोक खरातने केलेली भविष्यवाणी खरी ठरणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

नाशिकमधील कुख्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) रोज चौकशी सुरू आहे. या चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे. आता अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याच्या दिशेने हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

1 / 5
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातकडून दोन-तीन नेत्यांच्या फोटोंवर ‘X’ (फुली) मारण्यात आली होती. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर मात्र फुली मारलेली नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सरकारला महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, अशोक खरातला आयुष्यभर कारागृहात डांबण्यासाठी तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांची माहिती आहे.

2 / 5
चौकशीदरम्यान अशोक खरात मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला असल्याचे दिसून आले आहे. तो आता मरणाची भाषा बोलू लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने चौकशीत म्हटले आहे की, “मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे.” याच अशोक खरातने स्वतःला दैवी अवतार म्हणवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे. सध्या त्याच्यावर एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तिसऱ्या गुन्ह्यात त्याची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीत खरातने फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळत आहे. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

3 / 5
अशोक खरात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. अशोक खरात आणि त्यांची पत्नी कल्पना खरात यांची तीन बँक खाती Enforcement Directorate (ईडी) ने सील करण्यात आली आहेत. संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, खरातने बनावट सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून त्याने अनेकांना फसवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4 / 5
यामुळे नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील त्यांच्या बँक खात्यांची तपासणी सुरू आहे. खरातच्या खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणात अशोक खरातच्या मालमत्तेवरही लवकरच टाच बसण्याची शक्यता आहे.

5 / 5
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now