टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र

राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आज अजित पवार यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवारांना एक भावनिक पत्र लिहलं आहे.

Amol Mitkari :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे सगळेच बडे नेते बारामतीत दाखल झाले होते. माजी आमदार अमोल मिटकरी हे देखील आले होते. यावेळी मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी ‌या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. तसेच त्या ठिकाणी मिटकरी यांनी दिवंगत अजित पवार यांना लिहलेलं एक पत्र देखील ठेवलं आहे. बारामतीत तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही, आता हा शेवटचा पत्रव्यव्हार तुमच्या बलिदान स्थळी असा उल्लेख मिटकरींनी केला आहे.

पत्रात नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? 

आदरणीय दादा,

28 जानेवारी 2026 च्या काळ्‌या दिवसानंतर आज आद‌र‌णीय सुनेत्रा वहिनींच्या बारामती पोटनिवडणुकीच्या निमीत्ताने दुसयोध गोजुबावी ‌ह्या दुर्देवी स्थळी आलोय. बारामती मधे तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही. आता हा शेवटचा पत्रव्यव्हार तुमच्या बलिदान स्थळी. बलिदान स्थळ म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलेल तुमचं बलिदान. तुमच्या बाबत मात्र महाराष्ट्र दुदैवी ठरला की तुम्ही दुर्देवी ठरला हे कोडं आता मरेपर्यंत उलगडणार नाही. गोजुबावीचं रहस्य या माळरानावर दबलयं.

आज माझ्या भावना निशब्द आहेत. तुम्ही दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आता तुमचं जाणं हे गुढ राहू नये. तुम्हाला न्याय मिळाला पाहीजे. राज्यातील तुमच्या चाहत्यांना एकत्र करुन नवा लढा उभारेल. इतकीच सेवा करु शकलो.

तुम्ही दिलेला बॅच आणि आय कार्ड तुमच्या चरणी अर्पण
माफी असावी!

अजितदादा आजही आपल्यातच आहेत”: सुनेत्रा पवारांची भावूक साद

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आयोजीत केलेल्या मेळाव्याला संबोधित करताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “दोन महिन्यांपूर्वी आम्ही आमचे आधारस्तंभ, अजितदादांना गमावले. दादा आज आपल्यात भौतिकदृष्ट्या नाहीत, यावर आजही माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनानंतर बारामतीवर पोटनिवडणुकीची अशी वेळ येईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांनी आपला शेवटचा श्वासही आपल्या लाडक्या बारामतीच्या मातीतच घेतला.” अजितदादांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती