टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. विद्यार्थी आंदोलन आणि पेपर फुटीचे गंभीर प्रश्न चर्चेला आले. मोदींनी ट्विट करत भेटीचे फोटो शेअर केले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पवारांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. पावसाळी अधिवेशन आणि जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची ठरली.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या भेटीचे चार फोटो शेअर केले आहेत. या भेटीत पवार यांनी मोदींना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. पवार हे थोड्यावेळात माध्यमांशी भेटून या भेटीची माहिती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपली भेट घेतल्याचं म्हटलं आहे. संसदेत ही भेट झाल्याचं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या भेटीचे मोदी यांनी चार फोटो शेअर केले आहेत. या भेटीत पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मोदींना दिली. तसेच पेपर फुटीबाबत काय उपाययोजना करता येईल याची चर्चाही या भेटीत झाल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर आपली भूमिकाही पवारांकडे मांडल्याचं सांगितलं जात आहे.\

फोटोत काय दिसलं?

मोदींनी या भेटीचे चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सुप्रिया सुळेही दिसत आहेत. मोदी आणि पवार चर्चा करताना या फोटोत दिसतंय. पवारांच्या हातात एक फाईल आहे. त्यातील एक कागद पवारांनी मोदींना दिल्याचं दिसत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाबाबतचं हे निवेदन असल्याचं सांगितलं जात आहे. मोदी हे कागद वाचताना दिसत आहेत. त्यानंतर या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. शेवटच्या फोटोत मोदी पवारांचे हात पकडून त्यांच्यासोबत चालताना दिसत आहे.

 

काल आंदोलनात

दरम्यान, सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर काल जंतरमंतरवर देशातील विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी दीपके यांची भेट घेऊन आंदोलकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. देशातील विरोधी पक्ष आंदोलकांच्या पाठीशी आहे, हे दाखवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते जंतमंतरवर आले होते. स्वत: शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा जंतरमंतरवर आले होते. त्यांनी दीपकेंची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? असा सवाल पवार यांनी केला दीपकेंना केला होता. त्यावर दीपके यांनी सध्या तरी मदतीची गरज नसल्याचं पवारांना सांगितलं होतं.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 22nd August 2026 : आज ग्रहांची चाल बदलणार चित्र ! मेष ते मीन जाणून घ्या राशिभविष्य

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

एका आयफोनमुळे गेला तिघांचा जीव, छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील अन् मुलाचा मृत्यू

Plane crash : विमानाचा भीषण अपघात, लँडिगच्या तयारीमध्ये असताना थेट खाली कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं