टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भामरागडच्या वनराईतील आदिवासी संस्कृती आदिवासींचा जीवन संघर्षाचा निलकंठ शिंदे सरांनी घेतला अनुभव

On: June 14, 2025 10:45 AM
Follow Us:

दुसर्‍याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही :-डॉ प्रकाश आमटे

सांगोला (प्रतिनिधी):- हेमलकसा येथील लोक बिरादारी प्रकल्पात आयोजित श्रमसंस्कार शिबिरात सांगोल्यातील निलकंठ शिंदे सर व नंदेश्वर येथील कृष्णा सरगर या दोन युवा शिक्षण क्षेत्रातील शिक्षण प्रेमीनि या श्रमसंस्कार शिबिरात सहभाग नोंदवत या लोक बिरादरी प्रकल्पात आपले श्रमदान यशस्वीरित्या पूर्ण केले.

शिबिरादरम्यान भामरागडच्या वनराईतील आदिवासी संस्कृती ,लोकांची जीवनशैली ,परंपरा आणि आदिवासींचा जीवन संघर्ष अशा अनेक गोष्टींचा अनुभव या दरम्यान गडचिरोलीतील हेमलकश्यात अनुभवला. गेल्या 15 ते 30 मे दरम्यान छत्तीसगड, तेलंगाना व महाराष्ट्राच्या सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा मधील लोक बिरादरी प्रकल्पामध्ये श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. सबंध महाराष्ट्रातून 300 शिबिरार्थींची निवड येथील निवड समितीद्वारे करण्यात आली होती त्यामध्ये आमची निवड झाली हे आमचे भाग्यच.प्रकल्प भेट आदिवासी संस्कृती, श्रमदान, निर्मिती, गाव भेट, बौद्धिक सत्र, शिबिरार्थ्यांची चर्चासत्रे, मैदानी खेळ आदींचे शिबिरात आयोजन केले होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव वावगे, पाणी फाउंडेशनचे डॉ.अविनाश पोळ ,कलाकार किशोर बाली, नंदकुमार मुरमुरे आदींचे मौलिक मार्गदर्शन शिबिरार्थींना लाभले. शिबिरात सहभागी झालेल्या आम्ही सर्वांनी भितीचिंत्रांचे अनिकेत आमटे आणि परिवाराने कौतुक केले. हेमलकसा येतील श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने डॉ. प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे आणि अनिकेत आमटे यांचे लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सुरू असलेले आणि वन्यजीव अनाथालयाचे काम पाहण्याची संधी मिळाल्याचे आनंद झाल्याचे सांगितले.

आंतरभारती श्रमसंस्कार शिबिराची आयोजन करण्यात येते. समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पामध्ये अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन होते. या भागात आमटे कुटुंबीयांनी 20 वर्षे कोणतीही विद्युत सुविधा नसताना निस्वार्थीपणे येथील आदिवासी लोकांना सेवा देण्याचे कार्य केले आहे .या अशा शिबिरामुळे आम्हा समाजसेवकांना नेहमीच ऊर्जा मिळते. दुसर्‍याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही; त्यासाठी एकट्यालाच ऊन्हात उभे राहावे लागते असे डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी वेळोवेळी आम्हाला या शिबिरात मार्गदर्शन करून पुढील सामाजिक वाटचालीकरता महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. आमटे कुटुंबांची तिसरी पिढी ही या समाजसेवेत कार्यरत आहे त्यामुळे महाराष्ट्र पुढे एक वेगळा आदर्श त्यांनी या समाजसेवेतून सुरू ठेवला असून निश्चितच प्रेरणादायी आहे.

श्री निलकंठ शिंदे सर- अध्यक्ष :-शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना सांगोला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा