टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्यासाठी नवीन एम.आय. डी.सी.मंजूर करणार – उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांचे आश्वासन

On: June 26, 2025 6:45 PM
Follow Us:

माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या मागणीस यश

सांगोला/प्रतिनिधी :- सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन भव्य एम. आय. डी. सी .उभारावी अशी मागणी उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांची भेट घेऊन केली . सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नवीन एम. आय. डी. सी .मंजूर करण्याचे आश्वासन माजी आम. अँड. शहाजीबापू पाटील यांना दिले आहे.

नवीन एम.आय.डी.सी मुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आले आहे. भविष्यात उद्योग व्यवसाय वाढल्याने तालुक्यात क्रांती होईलअशी माहिती सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीप्रसंगी उद्योगपती अभिजीत नलवडे ,योगेश खटकाळे, विशाल खटकाळे हे मान्यवर उपस्थित होते.

माजी आम.ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या मागणीला व पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. नवीन एम .आय. डी. सी. निर्मितीमुळे भविष्यात तालुक्यात उद्योगाचे जाळे निर्माण होवून तालुक्याची अर्थव्यवस्था बळकट होईल . तरुणांना नोकरी मिळेल. त्यामुळे सांगोला तालुक्याचा व्यापारीदृष्टया विकास होईल व तालुक्याच्या विकासास चालना मिळेल. व्यापारी व औद्योगिकदृष्ट्या तालुक्याचा कायापालट होणार आहे अशी माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा